जगण्याला जीवन म्हणण्याईतका मी कोणी सम्राट ययाति किंवा अलक्शेन्द्र वगैरे कोणी नाही.. पण जीवनातले आणखी एक पर्व संपले असे वाटतंय .....त्याचं प्रतिक म्हणुन यंदा पुण्यनगरीत गेलो होतो तेव्हां सोनाराकडे जाऊन भिगबाळी टोचुन आलो.. रामाशास्त्र्यांसारखी चांगली तोळ्याचीच घालणार होतो .. पण तेव्ह्ढी कुवत अजुन झालेली नाही असे माझ्या स्वत:च्याच लक्शात आले आणी " ओझं पेलवणार नाही तुम्हाला .. त्रास होईल.. " असे सोनारानेही सांगितले...
या पर्वाने खास करुन बरेच काही शिकवले.. सरस्वती समवेत लक्ष्मीनेही क्रुपा केली.. ईतके वर्ष स्वत:ला कधीच भावनेच्या आहारी जाऊन दिले नव्हते.... पुरुषांना भावनाप्रधान होण्याचा जन्मसिध्द हक्कच मुळी देवाने दिलेला नाही अशी स्वता:ची ठाम धारणा होती.. अजुबाजुच्या परिस्थितीने अतिशय ह्रुक्ष बनवले होते.. एखादया दगडासारखंच म्हणाना...त्यातुन परत arien असल्याने ती martian energy खुप प्रकर्षाने दिसुन येत असावी एखाद्यावेळेस... अयुष्याला एक न संपणारे रणांगण बनवले होते मी.. आणी स्वत:ला एक योध्दा.. जरी ब्राह्मणपुत्र असलो तरी एक खरा देशपांडे असल्या कारणाने क्षत्रियत्वाचा अंश प्रकर्षाने अंगी बाळगुन आहे....
भारतात असतानाही कधी विषेश कोणाकडे गेलो नाही.. नाही विषेश कोणाच्या कार्यक्रमात भाग घ्यायचो.. फक्त मी आणी माझं so called career.. मीत्र होते.. आहेतही.. पण काही सोडले तरं कधी एवढं कोणाविषयी विषेश काही वाटलं नाही.. त्यामुळेच काही लोक मला जेव्हा john nash म्हणतात तेंव्हा आता कळतंय की त्याचा अर्थ ऎकंदरीतच actually काय आहे ते.. (ironically मी तेव्हढा exceptionally talented सुध्दा नाहीये.. पण त्यातला ऊपरोध आता मला कळुन येतोय.. माणुसघाणेपणा प्रकर्षाने जाणवतोय.. ) ...
प्रक्रुतीने टाकलेली सगळी आव्हाने न डगमगता , न घाबरता ऊघड्या छातीने पेलली.. कुठल्याही गोष्टीचं कधी दु:ख बाळगलं नाही.. कधी कधी वाटतं एवढा strong मी का अणी कसा काय होतो.. or rather खरंच एवढा strong मी आहे का.. ?..
आयुष्यात बर्याच जणी (म्हणजे बोटावर मोजण्या ईतक्याच ) आल्या.. पण perticularly हीच्या बाबत ज्या काही गोष्टी अनुभवल्या त्या या आधी कधीच कोणाबद्दलही अनुभवल्या नव्हत्या.. जेव्हा एखादी स्त्री आपल्याला "आयुष्यभर माझा होशील का ? " असं विचारते .. त्या मागचा तिचा अथांग द्रुष्टीकोन समजायला खरंच किती matureness लागतो हे आत्ता आत्ता मला कळलंय.. हे सुध्दा तिला हरवुन बसल्या नंतर.. may be माझा भावनिक ऊथळपणा त्याला कारणीभुत असेल.. हा प्रश्न या आधीही माझ्यासमोर ठेवण्यात आला होता पण तो मी तेव्हड्याच ऊधटपणे म्हणा किंवा काही म्हणा झटकुन टाकला होता.. जेव्हा छोट्या भावाचं त्याच्या जिवनसंगिनीवरचं प्रेम पाहिलं तेव्हा कळलं की professional front वरती जरी आज मी कितीही successful असेल तरी personal front वरती आजुनही मी एक नवशीकाच आहे.. त्याच्या कडे बघुन कळालंय की एखाद्या व्यक्ती बरोबर सहा वर्षे व्यतीत करणं आणी मग तीला आपली जीवन संगीनी बनबाणे म्हणजे नेमकं काय असतं.. स्त्री-पुरुष नात्याबद्दल एवढा सखोल विचार यापुर्वी कधीच केला नव्हता.. म्हणुनच वाटतं की हीनं मला खरं प्रेम करायला शिकवलं.. खर्या द्रुष्टीने माणसात आणलं.. प्रत्येकाच्याच आयुष्यात आसे आत्म साक्शात्काराचे क्षण येत असतात.. आयुष्याच्या या समुद्रमंथनातुन उत्पन्न होणारे विष सगळ्यांनाच त्रासदायक ठरते मग त्याचा माझ्यावर झालेला प्रभाव मी का मान्य करु शकत नव्हतो... खरच त्रास होतोय हे मान्य कर्ण्यातच पुरुषार्थ नव्हे का..
बरं ती म्हणजे या आधींच्या पेक्शा खुप एकमेवाद्वितीय वगैरे होती आशातलाही भाग नव्हे.. तीचं ते earthly nature च मला जास्त आवडलं होतं.. तीच्यातल्या त्या imperfections मुळेच मी ऎवढा आकर्शीत झालो होतो... लोकांमधले shortcomings मला कधीच त्यांना सांगता आले नाहीत... आणी मी सुध्दा स्वत: epitome of perfection वगैरे आहे असे मला कधीच वाटले नाही... त्यामुळे चुक कोणाची होती ... यावरती वैचारीक घोळ मी या आधी प्रमाणेच अत्ताही अजिबात घातलेला नाही..
पुण्यनगरीत असताना आणखी दोघींना भेटलो.. त्यातली एक b.a.m.s. होती आणी दुसरी gynaec.. (भावनाशुन्यतेच यापेक्षा वेगळं ऊदाहरण काय ते द्यावं माणसाने.. त्यांच्या degrees लक्षात आहेत पण त्यांची नावं विसरलोय.. ) पण जरी शरीराने त्यांना भेटलो तरीही मनाने मात्र हिच्याबरोबरच होतो.. माझ्यातला पुरुषा त्यांच्या कडे आकर्शीत झालाही असेल.. पण तरीही.. कुठेतरी पाणी मुरतय असं सारखं वाटत होतं.. "किती विचित्र आहेस "... "मला तुझी भिती वाटते.. " हे ती का म्हणाली असेल..हे आत्ता मला थोडं थोडं कळतंय.. खरंच किती harsh व्यक्तिमत्व आहे माझं .. माझ्यात तिनं काय बघितलं हे त्या परमेश्वरासही सांगणे महा कठीण जाईल...
त्याचं काय आहे ... कुठल्याही गोष्टीचं मुळापर्यंत जाऊन किस काढायचा हा माझा पेशा ...technocrat असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला logic लावायचं असतं हेच शिकलोय.. पण माणुस पुर्ण आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो हे जे कोणी म्हटलंय ना तो खरच अतिशय महान आहे... अजुनही बर्याच गोष्टी शिकायच्यात मला.. पर्वा एकाला interview मध्ये एक साधं coffee machine बनव असं सांगितलं तर त्याने चक्कं हजार एक events आणी मग त्यासाठीचा एक event handler ,आणी त्या coffee machine साठी आजुन एक हजार subsystems वगैरे असणारं design माझ्या समोर ठेवलं .. मनातल्या मनात मी हसलो.. पण किती खरं आहे हे .. की आपण सगळेच softwareवाले आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी अतिशय complicated करुन त्यांची पार वाट लाऊन टाकतो.. software products ला लावाणार्या testing methods आपल्या आयुष्यातल्या गोष्टींना लावतो.. आणी आयुष्य bug free करण्याचा प्रयत्न करतो.. "मग ती या condition मध्ये कशी वागेल.. मग ती त्या conditionला कशी सामोरी जाईन.. " नसता फापट पसारा..
आज माझ्यातला योध्दा स्वता:ला पानिपतात ऊभा पाहातोय... आणी ही वेळ फारच वेगळी आहे.. कारण शत्रु नवीन आहे... भावना.. त्यांना कसं काय शिकस्त द्यायची हे या योध्द्याला माहितच नाहीये.. पण पराजय हा तर त्याला कधीच ठाऊक नाहीये.. या वावटळीत पुर्ण गुरफटलाय तो... "जिंदगी मै बहुतसी चिजे ऐसी होती है की जो पेहेली बार करनी पडती है.. ".... म्हणुनच वाटतय त्यांच्या आहारी तर जाणार नाहीच तो मुळी.. यातुनही बाहेर पडेल दिग्विजयी होऊन .. आणी नविन काहीतरी शिकुन ... यापुढे आयुष्यात येणार्या स्त्रीला नक्कीच न्याय देऊ शकेन तो...
पण कितीही म्हटलं तरी हिला विसरु शकेल का... ? बर्याच गोष्टी आपल्या समजण्याच्या पलिकडच्या असतात... असं म्हणुन् स्वताःचच सांत्वन करतोय मी.....
बाकी ....................सगळी श्रींची ईच्छा.....
Sunday, February 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)





2 comments:
Jivan sarv sreshth anubhav aalla aahe tyacha paropar wappar karra !!!!
vachkancya mnat wawtal nimrman krnara lekh.
Post a Comment